Video Songs
Typography

शशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक सागर छाया वंजारी दिग्दर्शित या सिनेमाचे 'देवाक् काळजी रे' हे गाणं टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. हे गाणं सध्या वायरल होत आहे.

लोकांमध्ये खास पसंती मिळवत असलेल्या गुरु ठाकूर यांच्या या गीताला राज्यपुरस्कारप्राप्त गायक अजय गोगावले यांनी स्वर दिले आहेत, तर सर्वोत्कुष्ट संगीतासाठी राज्यपुरस्कार विजेते विजय नारायण गवंडे संगीत दिग्दर्शित, हे गाणे थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे आहे. शिवाय काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील 'करकरता कावळो' हे गाणेदेखील प्रेक्षकांचे भरगोस मनोरंजन करण्यास यशस्वी झाले आहे. मालवणी भाषेचा आणि संस्कृतीचा ओलावा जपलेला 'देवाक काळजी रे' हे गाणे देखील प्रेक्षकांना आपलेसे करेल यात शंका नाही.

Watch The Song Here

लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात रेडियोची गमतीदार गोष्ट सांगण्यात आली आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement