Video Songs
Typography

प्रेमात असताना मनाची होणारी तगमग ‘कधी कधी’ या गाण्यामधून प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे. ‘कधी कधी’ गाण्याचा मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे रोहित राऊतचा. हे गाणे वरुण जैन यांनी रचली आहेत. संगीत अनय नाईक यांचे तर नृत्यदिग्दर्शन नितीन जाधव, अवी नंदू यांनी केले आहे. गाण्यामध्ये दिसणारे चेहरे म्हणजे ‘लव्ह लफडे’ करणारी एक नवी जोडी रोहित फाळके आणि रुचिरा जाधव या दोघांची.

मराठी चित्रपट क्षेत्रातील ही जोडी आपल्याला पहिलं प्रेम आणि त्या आठवणी घेऊन जाणार आहे. आपल्या अभिनयातून पुन्हा पुन्हा प्रेमाची प्रत्येक आठवण जगायला लावणार आहेत रोहित आणि रुचिरा. रोहित फाळकेंचा अभिनय बि.पी मधील अव्या, मांजा या चित्रपटमधून आपण पाहिला आहे. तर रुचिरा प्रेम हे, तुझ्या वाचून करमेना, प्रिती परी तुझवरी, बे दुने दहा, पती माझे सौभाग्यवती अशा विविध सिरियलमधून तर आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सोबत या चित्रपटामध्ये झळकली होती. कॉलेज लाईफची धम्माल मस्ती, प्रियकर, पुणेकर, मुंबईकर, सातारकर मित्रांची केमिस्ट्री, लव्ह आणि त्यातील लफडी, मग त्यांना भेटलेला एक लव्ह गुरु म्हणजे अभिनेता सुमेध गायकवाड या सगळ्याची कथा आपल्याला लव्ह लफडे चित्रपटात पाहण्यास मिळणार आहे.

Watch the Song Here

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement