Video Songs
Typography

परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या ह्या तीन इरसाल मित्रांची धमाल कथा ‘इपितर’ सिनेमाव्दारे येत्या १३ जुलैला रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ह्या सिनेमाचे ‘मौनास लाभले अर्थ नवे’ हे रोमँटिक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. विजय गिते आणि निकिता सुखदेव ह्यांच्यावर चित्रीत झाले आहे.

प्रशांत मुडूपुवार ह्यांनी लिहीलेल्या ह्या गीताला सत्यजीत केळकर ह्यांनी संगीतबध्द केले आहे. सध्याची आघाडीची गायिका सावनी रविंद्र आणि गायक अभय जोधपूरकर ह्यांनी गीताला स्वरसाज चढवला आहे.

सावनी रविंद्र ह्या गीताविषयी सांगते, “अभय जोधपूरकर आणि मी मराठी भावगीतांसोबतच दक्षिणात्य सिनेमातल्या गीतांसाठीही एकत्र गाणी गायली आहेत. आमची चांगली मैत्री आहे. त्यामूळेच कदाचित पार्श्वगायन करतानाही आम्ही एकमेकांना उत्तम साथ-संगत करतो. आणि गाणं चांगलं होतं, असं मला वाटतं. सत्यजीत आणि मी सूध्दा एकत्र काम केल्याने आमच्या तिघांचं टीमवर्क उत्तम झाल्याची प्रतिक्रिया सध्या मला मिळतेय. इपितरमधलं हे गाणं जेवढं आम्हांला आवडतं, तेवढंच कानसेनांनाही आवडेल अशी मला अपेक्षा आहे.”

डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती किरण बेरड आणि नितीन कल्हापुरे ह्यांनी केली आहे. सुधीर बोरूडे, दत्ता तारडे आणि विकास इंगळे ह्यांची सहनिर्मिती असलेल्या इपितर ह्या विनोदी सिनेमाचे लेखन किरण बेरड ह्यांनी केले असून दिग्दर्शन दत्ता तारडे ह्यांनी केले आहे. भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वृंदा बाळ आणि सुहास दुधाडे ह्यांच्या मुख्य भूमिका असलेला इपितर हा सिनेमा १३ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Advertisement