Video Songs
Typography

ज्या गाण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहात होतात ते गाणे आले आहे. पाटील चित्रपटातील भव्य शीर्षक गीत. शिवबाची आन तू, राष्टाची शान तू .. पाटील पाटील पाटील....

VFX चा वापर करुन चित्रीत करण्यात आलेल्या या शीर्षक गीतात गगनाला भिडणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती आहे. या गाण्यातून पाटीलकी ची सुरुवात कशी झाली आणि सच्चा पाटील कोण याचे वर्णन केले आहे. या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत.

Watch the Song Here

गायक : आदर्श शिंदे, आनंद शिंदे, आणि सोनाली पटेल
संगीत : सोनाली - उदय
गीतकार : संजय वारंग आणि एस आर एम एलिअन

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, सौरभ तांडेल, विजय जैन, जेनील शाह, सोमनाथ दिंगबर, हाजी पटेल, दिपक दलाल सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकांती, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी सुरेश पिल्ले यांनी सांभाळली आहे.

स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement