Video Songs
Typography

राजीव एस. रुईया दिग्दर्शित 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमातील 'तू हाथ नको लावू' हे गाणे सोशल मीडियावर हिट ठरते आहे. हे गाणे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका स्वाती शर्मा हिने गायले आहे. स्वाती शर्माचे 'तनु वेड्स मनू २' सिनेमातील 'बन्नो' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने स्वाती शर्मा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

या सिनेमातील सर्व गाणी ही स्वातीने एकटीनेच गायली आहेत. स्वातीच्या 'तू हाथ नको लावू' या गाण्याला सोशल मीडियावर ४ लाख व्हियूज आहेत. हे गाणे मीरा जोशीप्रियदर्शन जाधव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

Watch the Song Here

राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. हा सिनेमा येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement