Video Songs
Typography

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि स्फूर्तिस्थान असलेल्या श्री विठ्ठलावर आधारित 'विठ्ठल' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ह्या चित्रपतील विठ्ठला विठ्ठला हे गाणे रिलीज झाले आहे. भरपूर दिवसांनी मराठी मध्ये दिसणारा श्रेयस तळपदे हा २५ फूट अशा भव्य विठ्ठलाच्या मूर्ती समोर वंदन करताना दिसत आहे. २५० डान्सर सोबत ढोल ताशा पथक, अबीराची उधळण, भगव्या पताका, गाण्याच्या शेवटी सचित पाटील च्या रूपात होणारे विठ्ठल दर्शन आणि विशाल दादलानीचा दमदार आवाज यासर्वातूनच या गाण्याची भव्यता बघायला मिळत आहे. सदर गाणे गुरु ठाकूर यांनी लिहिले असून राजू सरदार यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

Watch the Song Here

राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन सोबत टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचित पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे. 'विठ्ठल' नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाच्या निर्मीतीची धुरा दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी सांभाळली असून, जगदीश जाखड, प्रह्लाद सिंह राजपुरोहित आणि अरुण त्यागी हे सहनिर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच 'विठ्ठल' या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे.

विठ्ठल हा चित्रपट ७ डिसेंबर ला जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News