Video Songs
Typography

कुठल्याही पट्टीत तितक्याच ताकदीनं गाणाऱ्या शाल्मली खोलगडेचं नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. अभिजात गायकी, आवाजाचा उत्तम पोत आणि क्लासिकल व्हाया पॉप अशा साऱ्याच विभागांत मुक्त संचार असणाऱ्या शाल्मलीच्या गाण्यांची मजा काही औरच! 'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटात शाल्मलीने एक खास रोमँटिक गाणं गायलंय जे तुफान गाजतंय. केवळ दोनच दिवसांत फेसबुक आणि यूट्युबवर लाखांत मिळणारे लाईक्स आणि व्ह्युज् ने अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' चित्रपटाची क्रेझ आणखी वाढली आहे.

हे मन माझे का भिरभिरते.. तू असताना अवतीभवती रेंगाळते…
हसताना तू मी दरवळते... हरवून जाते मी मग माझी का वाटते...

गणेश-सुरेश या द्वयींनी शब्दबद्ध केलेल्या या मोहक गीताला संगीतकार रेवा यांनी मंद्र सप्तकात बांधलंय ज्याला शाल्मलीने आपल्या स्वरसाजाने योग्य तो न्याय दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लाईट हार्टेड म्युझिकचा उत्तम पीस असणारं हे गाणं प्रेक्षकांनाही प्रेमात पाडतंय. आपण नेहमीच शाल्मलीचा वरच्या पट्टीतला आवाज ऐकत आलो आहोत पण 'हे मन माझे' रसिकांना शाल्मलीच्या आवाजातला नटखट गोडवा ऐकण्याची संधी देतंय. 'हे मन माझे' गाणं आपल्यासाठी खूप स्पेशल असल्याचं म्हणत, शाल्मलीने 'कॉलेज डायरी'च्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा ही दिल्या आहेत.

Watch the Song Here

कॉलेजच्या मयूरपंखी दिवसांच्या आठवणी पुनुरुज्जीवत करणाऱ्या 'कॉलेज डायरी'ची कथा अनिकेत जगन्नाथ घाडगे यांनी लिहिली असून संवाद सुद्धा त्यांचेच आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, हेमलता रघू, जनार्दन कदम, शिवराज चव्हाण, शुभम राऊत आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

मन प्रसन्न करणारा 'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement