Video Songs
Typography

शीला, मुन्नी, जलेबीबाई अशा आयटम साँग नंतर आता 'रसगुल्लाबाई' प्रेक्षकांसमोर येत आहे. आम्ही बेफिकर या चित्रपटात हे धमाकेदार आयटम साँग पहायला मिळणार असून, प्रियंका झेमसेनं या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. कडाक्याच्या थंडीत या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं.

प्रियांका झेमसेनं आतापर्यंत अनेक चॅनेल्सवर व्हीजे म्हणून काम केलं आहे. तसंच वेब सीरिजही केल्या आहेत. या आयटम साँग बद्दल प्रियांका म्हणाली, "या गाण्याचं शूटिंग माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीत तीन दिवस शूटिंग केलं होतं. जवळपास दहा सेल्सियसपेक्षाही कमी तापमान होतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकतेचा कस लागत होता. मात्र, संपूर्ण टीमनं सहकार्य केल्यामुळे धमाल पद्धतीनं हे गाणं शूट झालं. धमाकेदार शब्द असलेलं हे गाणं प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल."

Watch the Song Here

हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी 'आम्ही बेफिकर' या चित्रपटात दिसणार आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाचे संगीत केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

युथफूल विषय, उत्तम स्टारकास्ट, दमदार तांत्रिक बाजू असलेला "आम्ही बेफिकर" हा चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement