लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या सिनेमातील नुकतेच 'गूज' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळ्यातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या सिनेमात मांडण्यात आला असून, 'गूज' या गाण्यामधून देखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हे गाणे ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून, देबारपितो यांचे काळजाला भिडणारे संगीत त्याला लाभले आहे.

प्रेमाच्या विरहातील गाणी सध्या तरुणाईमध्ये खूपच गाजतात. त्यात आता एक नवं गाणं तरुणाईच्या भेटीला आले आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेचे ‘लव्ह लफडे’ सिनेमातील ‘तु परी’ हे गाणं नुकतचं रिलीज झालं आहे. संगीत दिग्दर्शक अनय नाईक, नृत्य दिग्दर्शक नितीन जाधव, तर गाण्याचे शब्द सचिन आंबत, संजय मोरे, अजय थोर्वे या तरुणांनी रचले आहेत. “धुंद स्वप्नातला, धुंद चेहरा तुझा, धुंद झाली नजर, जीव वेडावला, माझ्या मनातली तुच परी” या गीताला तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्तेचा आवाज भावनिक करुन जातो. अवधूत गुप्तेच्या सुंदर आवाजामुळे ती परी आपल्यासमोर आपसूक उभी राहते.

लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या आगामी सिनेमातील एक रंगबेरंगी गाणे, नुकतेच लाँच करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर आधारित असलेल्या, या सिनेमातील 'ता ना पि हि नि पा जा' हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडणारे आहे.

चित्रपटाची ओळख कशाही पद्धतीनं होऊ शकते. चित्रपटाची ओळख गाण्यांनी होते, कथानकानं होते, मांडणीनं होते, अभिनयानं होते, छायांकनाने होते... १३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या "लेथ जोशी" या चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.

परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या ह्या तीन इरसाल मित्रांची धमाल कथा ‘इपितर’ सिनेमाव्दारे येत्या १३ जुलैला रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ह्या सिनेमाचे ‘मौनास लाभले अर्थ नवे’ हे रोमँटिक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. विजय गिते आणि निकिता सुखदेव ह्यांच्यावर चित्रीत झाले आहे.

हल्ली मराठी चित्रपटांच्या हटके नावाचा ट्रेंड रुजू झाला आहे. या हटके नावांमुळे चित्रपटांची प्रसिद्धी अधिक होत असल्याकारणाने, मराठी सिनेमांच्या या अद्भुत नावांचे स्वागतदेखील सिनेरसिक करताना दिसून येत आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा देखील याचे उत्तम उदाहरण आहे. येत्या १३ जुलै रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील 'दारू डिंग डांग' हे गाणेदेखील सिनेमाच्या नावाला साजेल अगदी तसेच आहे! नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर आणि टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्याला अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळत आहे.

Advertisement