"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना पाहिल्यावर जी गोड भावना जाणवते ती या गाण्यातून सांगितली गेली आहे. चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे हे या गाण्यात दिसत आहे. एक हलकं फुलकं पण तितकेच रोमँटिक असे हे गाणं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाजात स्वरबद्ध केले असून मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. अतिशय सुंदर असे हे गाणे त्र्यंबकेश्वर जवळ चित्रित करण्यात आले आहे. गुरु ठाकूर आणि मंदार चोळकर यांनी अतिशय समर्पक शब्दात प्रेम हि भावना मांडली आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले.
'नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक सामान्य माणूस आपल्या बायको, मुलांना घेऊन जेव्हा प्रथमच बाहेर फिरायला निघतो तेव्हा तो मॉल मध्ये जातो. आजच्या काळात महत्त्वाची ठरत असलेल्या मॉल संस्कृतीत तो जेव्हा फिरतो तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला 'मॉलचे' खूप अप्रूप वाटते. संपूर्ण मॉल नजरेने निहारताना त्याच्या नजरेत असलेली उत्सुकता आणि आनंद आपल्याला गाणं पाहताना जाणवते. सामान्य माणूस पैशाअभावी जो आनंद स्वतः घेऊ शकत नाही आणि परिवाराला देऊ शकत नाही. तो आनंद पैसे मिळाल्यामुळे कुटुंबाला देण्याचा प्रयत्न भाऊ कदम या गाण्यात करताना दिसत आहे.
स्वप्नील जोशी करतोय 'सचिन' चा जल्लोष या गाण्यातून
'मी पण सचिन' हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात स्वप्नील 'सचिन पाटील' नावाच्या एका ध्येयवादी माणसाची भूमिका साकारत आहे. अशा या प्रेरणादायी चित्रपतील 'आयला आयला सचिन आयला' हे जोशपूर्ण गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
'नशीबवान' भाऊंचा ब्लडी फुल परफॉर्मन्स
सुप्रसिद्ध मराठी कलाकार भाऊ कदम यांचा आगामी चित्रपट नशीबवान हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल हा सिनेमा प्रस्तुत करत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने, आणि अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामधील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं नुकतेच रिलीज झाले. उडत्या चालीचं असणार हे गाणं आनंद शिंदे यांनी स्वरबद्ध केले असून सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीत दिले तर शिवकुमार ढाले यांनी हे गाणं लिहिले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
श्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि स्फूर्तिस्थान असलेल्या श्री विठ्ठलावर आधारित 'विठ्ठल' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ह्या चित्रपतील विठ्ठला विठ्ठला हे गाणे रिलीज झाले आहे. भरपूर दिवसांनी मराठी मध्ये दिसणारा श्रेयस तळपदे हा २५ फूट अशा भव्य विठ्ठलाच्या मूर्ती समोर वंदन करताना दिसत आहे. २५० डान्सर सोबत ढोल ताशा पथक, अबीराची उधळण, भगव्या पताका, गाण्याच्या शेवटी सचित पाटील च्या रूपात होणारे विठ्ठल दर्शन आणि विशाल दादलानीचा दमदार आवाज यासर्वातूनच या गाण्याची भव्यता बघायला मिळत आहे. सदर गाणे गुरु ठाकूर यांनी लिहिले असून राजू सरदार यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे.
‘उन उन’ गाण्यातून दिसली ओम - मालविका यांची रोमँटिक केमिस्ट्री
चहा हा आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण घटक बनला आहे. चहाला काही ठराविक वेळ नसली, तरी वेळेला मात्र चहा लागतोच, असे अनेक चहाप्रेमी आपल्याला सर्रास भेटतात. आजवर आपण प्रेमाची परिभाषा मांडणारी अनेक गाणी ऐकली आणि बघितली असतील पण कधी वाफाळलेला कडक चहा आणि प्रेमाचा संगम अनुभवलाय? प्रविण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाभोवती फिरणारी प्रेमी युगुलाची हटके अशी केमिस्ट्री ‘उन उन’ या गाण्यात बघायला मिळते.