दिवाळी हा वर्षाचा, अपार आनंदाचा पवित्र सण साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येत असते. या आनंदामध्ये यंदा भर पडली ती ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याच्या घराघरातील आगमनाने. हे अगदी वेगळ्या शैलीचे गाणे जेवढे कर्णमधून आहे तेवढेच कुटुंबवत्सल आहे. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित केले. यावेळी संपूर्ण कलाकार चमू आणि या चित्रपटाची हिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे उपस्थित होती. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला गेला आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचा हा तिसरा भाग प्रदर्शित होत असून अशा पद्धतीने तीन भागात प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ‘मुंबई पुणे मुंबई-३’च्या माध्यमातून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे साकारात असलेल्या जोडीच्या आयुष्यातील महत्वाचा तिसरा टप्पा प्रेक्षकांसमोर येणार आहे. इतर कोणत्याही जोडीच्या आयुष्यात असतात तसेच टप्पे या जोडीच्या आयुष्यात असल्याने ही जोडी आणि त्यांची कथा पुन्हा एकदा घराघरात पोहोचणार आहे. हे गाणे पारंपारिक डोहाळजेवण (आता त्याला बेबी शॉवर असेही म्हणतात) समारंभातील असून ते चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यावर घराघरात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवेळी वेगवेगळ्या प्रकल्पातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि यावर्षी देखील एका आगळ्या-वेगळ्या, कूल भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोनाली कुलकर्णीचा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘माधुरी’. या चित्रपटातून सोनाली कोणती भूमिका साकारणार आहे, कथा काय आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित ‘माधुरी’ या चित्रपटात सोनालीसह शरद केळकर आणि संहिता जोशी यांची देखील प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे निर्माते मोहसिन अख्तर यांनी एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसाठी आणली आहे जी नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण नुकतेच, या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

राजीव एस. रुईया दिग्दर्शित 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमातील 'तू हाथ नको लावू' हे गाणे सोशल मीडियावर हिट ठरते आहे. हे गाणे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका स्वाती शर्मा हिने गायले आहे. स्वाती शर्माचे 'तनु वेड्स मनू २' सिनेमातील 'बन्नो' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने स्वाती शर्मा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

ज्या गाण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहात होतात ते गाणे आले आहे. पाटील चित्रपटातील भव्य शीर्षक गीत. शिवबाची आन तू, राष्टाची शान तू .. पाटील पाटील पाटील....

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते यांचं एक नवकोरं गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच झालं आहे. 'गॅटमॅट होऊ देना' असं या गाण्याचे बोल असून, तरुणांचा आवाज अशी ख्याती मिरवणाऱ्या अवधुतच्या आवाजातील हे गाणं कॉलेज तरुणांना अक्षरशः खूळ लावत आहे. युथला आपल्या तालावर थिरकवणारं हे रॉक गाणं आगामी 'गॅटमॅट' चित्रपटाचे शीर्षकगीत असून, येत्या १६ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शिवाय, बऱ्याच वर्षानंतर अवधूत 'गॅटमॅट' च्या निमित्ताने ऑनस्क्रीन झळकणार असल्याकारणामुळे, त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणे खऱ्या अर्थाने रॉकिंग ठरत आहे.

Advertisement