लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' या सिनेमातील, 'करकरता कावळो' हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. या गाण्याचे लेखन आणि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचे असल्यामुळे, हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक कलाकारांकडून हे गाणे गाऊन घेतले असल्यामुळे, या गाण्यात 'कोकणचो धम्माल' सिनेप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

एक कोवळं रोपटं...त्याच्या जागेवर आनंदाने‌ डोलणारं....अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं ? कोल्हापूरात आपल्या घरात.. अंगणात...मित्रांमध्ये...रमलेला हा मुलगा..".वायू "..... त्याला अचानक उचलून‌ मुंबईत आणलं आई-बाबांनी.... गोंधळलेल्या... घुसमटलेल्या वायूच्या मनांत आलेला हा वैताग...श्या... कुठे येऊन पडलो यार....श्या...!!

या कोळीवाड्याची शान, वाट बघतोय रिक्षावाला रिमेक या गाण्यांचे संगीतकार, बानुबया बानुबया, लागिरं झालं जी, येरे येरे पैसा, पिपाणी या गाण्यांनी अक्षरश: मराठी रसिक प्रेक्षकांना वेड लावले. यांचे गायक म्हणजे प्रवीण कुंवर. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज मनाला साद घालतो. प्रविण कुंवर विविध भाषांमध्ये तीस पेक्षा जास्त चित्रपटाचे संगीतकार आहेत. आतापर्यंत अनेक सुपरहीट गाणी देणाऱ्या प्रवीण कुंवर यांचं ‘ताईच्या लग्नाला’ हे नवीन गाणं सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

कोणताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचं दर्शन घडवणारं "दमछाक...." हे "बेधडक" या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियात चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. दमदार शब्द, उत्तम संगीत आणि अप्रतिम छायांकन ही या गाण्याची वैशिष्ट्य आहेत. "बेधडक" हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटातील ‘हाहाकार...’ गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता ‘हाहाकार...’ या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते.

Advertisement