बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नवी हिरोइन लाँच होताना, तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवी नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने पहिलं पाऊल ठेवताना तिच्यासाठी खास इंट्रोडक्शन साँग बनणे, हे कधी झाले नाही. पण संजय जाधव हे नेहमी आपल्या सिनेमांमधून काहीतरी हटके करण्यासाठी प्रचलित आहेत. त्यामूळेच त्यांनी आपल्या ‘नव्या’ हिरोइनसाठी खास हिरोइन-इंट्रोडक्शन साँग केले आहे.

‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्यानंतर आशिकीचा मॅडनेस अनुभवण्यासाठी ‘अशी ही आशिकी’ घेऊन आलंय एक हटके अकापेला गाणं ‘समझे क्या?’ दिलखुलास आशिकी करणाऱ्या स्वयम आणि अमरजाच्या रिलेशनशिपवर एका पेक्षा एक गाणी तयार करण्यात आली आहेत. सुरुवातीला हेमलच्या ऐवजी ‘रकम्मा’ गाण्यातून रकम्माला शोधणारा स्वयम, त्यानंतर मेड फॉर इच अदर अशी जोडी असलेल्या स्वयम आणि अमरजाचं रोमँटिक गाण्यातला क्युट रोमान्स आणि आता आशिकीची नशा वाढवणारं अकापेला गाणं.

मध्य प्रदेशातील माण्डवगड म्हणजे माण्डूगड हा राणी रूपमती आणि राजे बाजबहाद्दूर यांच्या काळजाला चटका लावून जाणाऱ्या आणि अकबर बादशाहला प्रायश्चित करायला भाग पाडणाऱ्या अजरामर प्रेमकहाणीचा साक्षीदार आहे. ह्याच ऐतिहासिक प्रेमकहाणीला साक्ष असलेल्या आणि विंध्य पर्वतरांगेतील निसर्गरम्य पण, काहिसे गूढ भासणाऱ्या मांडू गडावरील जहाज महालात चित्रीत झालेले, ‘व्हॉट्सॲप लव’ चित्रपटातील ‘शोना रे’ हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे. जगभरात ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्याचे असंख्य मनसुबे आखले जात असताना, हे नितांत सुंदर दिसणारे, अवीट गोडीचे आणि त्यात जावेद अली सारख्या मेलडी किंगने गायलेले गाणे, मराठी संगीत प्रेमींसाठी ‘व्हॅलेन्टाईन स्पेशल’ गिफ्ट ठरणार आहे. अजिता काळे यांचे बोल, नितीन शंकर यांचे संगीत आणि प्रख्यात गायक जावेद अली यांनी गायलेले हे सुमधूर गाणे हॅण्डसम हंक राकेश बापट तसेच सारेह फर ह्या इराणी अभिनेत्रीवर चित्रीत करण्यात आले आहे. विठ्ठल पाटील यांचे नृत्यदिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या सौंदर्यदृष्टीमुळे हे गाणे पाहणे, स्वत:लाच ट्रीट देण्यासारखे आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक प्रयोग "उन्मत्त" या मराठी चित्रपटासाठी करण्यात आला आहे. स्लिप पॅरालिसिस सारख्या वेगळ्या विषयावर आधारित "उन्मत्त" या साय फाय चित्रपटाच्या प्रमोशन साठी एक खास गाणे बनवण्यात आले असून त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. भुत रॅप या गाण्यामध्ये पारंपारिक भारुड आणि आधुनिक रॅप यांचा एकत्र वापर करून एक भन्नाट प्रयोग करण्यात आहे. हे गीत युगंधर देशमुखने संगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गायक जसराज जोशी यांनी ते गायले आहे तर शब्द कुमार गावडा व महेश राजमाने यांचे आहेत.

प्रेमाचं जाळ विणण्यासाठी ‘हिवाळा’ म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ’ आणि त्यात सोनेपे सुहागा म्हणजे फेब्रुवारी मधला व्हेलेंटाईन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकिर्तीचे नवनवे सोपान गाठण्याचा सुवर्णदिन. हे औचित्य साधून या वर्षी खास युथसाठी प्रस्तुतकर्ते अमेय विनोद खोपकर, निर्माते प्रशांत घैसास, सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि दिग्दर्शक जालिंदर कुंभार ‘रेडीमिक्स’चं वेड लावणार आहेत. आणि हे सरप्राईज म्हणजे लव्हरबॉय वैभव तत्ववादी, गुलाबी क्वीन प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांचा ट्रिपल ‘रेडीमिक्स’ धमाका. तरुणाईला झिंग लावणारी प्रार्थना आणि वैभव तत्ववादीच्या जोडीला नेहा जोशीची बिनधास्त अदाकारी व्हेलेंटाईन डेच्या एक आठवडा आधीपासूनच म्हणजे ८ फेब्रुवारी पासून सर्वांना एन्जॉय करता येणार आहे.

बी लाइव्ह प्रस्तूत, लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. अभय महाजन-दिप्ती सती ह्या लकी कपल सोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिध्दार्थ जाधव ह्यावेळी उपस्थित होते. पूण्यात झालेल्या ह्या सोहळ्याला पूणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली होती.

Advertisement