“मी सिनेमात झूम्बा डान्सरची भूमिका करते आहे, चित्रपटात मी अनिरुद्धला म्हणजे सचिन सरांना झूम्बा शिकवते! पण प्रत्यक्षात शूटिंगवेळी त्यांनीच मला झूम्बाच्या स्टेप्स शिकवल्या! मला जाम टेन्शन आलं होतं सचिन सरांना झूम्बाच्या सूचना देताना!” कायम टवटवीत असलेली प्रार्थना बेहरे तिच्या ११ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या “लव यु जिंदगी” सिनेमाबद्दल बोलताना शूटिंग करतानाचे किस्से सांगत होती.

नुकतीच झी युवा वाहिनीने वेगळ्या धाटणीची ‘वर्तुळ’ ही मालिका प्रेक्षकांसाठी सादर केली. मालिकेचे प्रोमोज पाहूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि आता त्यांचा मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जुई गडकरी आणि विकास पाटील यांच्या प्रमुख भूमिकेसोबतच अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे.

बाॅईज २ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री 'सायली पाटील' सोबत नुकत्याच MarathiCineyug.com ने मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये आम्ही सायलीला तिच्या अभिनय करीयरबद्दल, बाॅईज २ ला मिळत असलेल्या भरगोस प्रतिसादाबद्दल, तिच्या भुमिकेविषयी आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रश्न विचारले. सायलीने खूपच confidently उत्तरं दिली. तर नक्की पहा सायली सोबतची ही मुलाखत.

Page 1 of 5
Advertisement