Latest News
Typography

सई ताम्हणकर - वैभव तत्ववादी ची फिल्म ‘पाँडीचेरी’चे चित्रीकरण १ फेब्रुवारी पासून पाँडीचेरीमध्ये सुरू झाले आहे. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी सईचे पोस्टरही रिविल करण्यात आले आहे. ह्या पोस्टरमध्ये सईचा ब्लॅक एन्ड व्हाइट नो मेकअप लूक उठून दिसतो आहे.

पाँडीचेरी सिनेमाविषयी सई ताम्हणकर म्हणते, “ही पहिली फिल्म आहे जी आयफोनवर शूट करण्यात येणार आहे. माझ्या भूमिकेचा लूक खूप नॅचरल आहे. नो-मेकअप, नो-हेअरस्टाइल लूकमध्ये मी ह्यात दिसेन. संपूर्ण चित्रपट पाँडीचेरीत चित्रीत होईल. सिनेमाची प्रोसेस मी एवढी एन्जॉय करतेय की, पहिल्यांदाच एखाद्या कार्यशाळेला जात असल्यासारखी छान भावना आहे. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात अशी फिल्म यायला हवी, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्टझोनमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करता. त्यामूळे सध्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मी खूप उत्सुक आहे.”

Click image to see HD Poster

Pondicherry Announcement Poster Small

सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर ह्याची ही एकत्र दूसरी फिल्म आहे. ह्याअगोदर २०१६ मध्ये सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने काम केले होते. सिनेमातली भूमिका चांगली वठवता यावी, ह्यासाठी सईने १०-१५ किलो वजनही वाढवले होते.

आता तीन वर्षांनी दोघेही एकत्र काम करत आहेत. त्यात सईचा नो-मेकअप रिएलिस्टिक लूक सईच्या ह्या नव्या भूमिकेविषयी उत्कंठा वाढवणारा आहे. त्यामूळे पाँडीचेरीविषयी सध्या सईच्या चाहत्यांना आतूरता आहे.

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement