Latest News
Typography

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे आज मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. गेले वर्षभर ते कर्करोगाशी झुंज देत होते. गेल्याच वर्षी ९८ व्या मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

Ramesh Bhatkar No More 04

'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचा गायक-संगीतकार वासूदेव भाटकर यांच्या घरी ३ ऑगस्ट १९४९ मध्ये जन्म झाला होता. १९७७ मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची ६९ वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम असायचा. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर म्हातारपणाच्या म्हणाव्या तितक्या खुणा दिसत नव्हत्या. काही दिवसांपूर्वीच ते 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेत दिसले होते.

Ramesh Bhatkar No More 03

रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फूले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे. रमेश भाटकर यांच्या पार्थिवावर आज रात्री १० वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Ramesh Bhatkar No More 02

5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 5.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement