Reviews
Typography

सरळ साधी राहणी पण उच्च विचार... आपण जे बनू शकलो नाही ते आपल्या मुलाने बनावं हे स्वप्न आणि पाटील म्हणजे नेमकं काय हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'पाटील' सिनेमा. प्रथम दिग्दर्शकीय पदार्पण करणाऱ्या संतोष राममीना मिजगर यांनी पाटील चित्रपटाची कथा पटकथा आणि संवादही लिहीले आहेत आणि त्यांनी शिवाजी पाटील ही मध्यवर्ती भुमिकाही साकारली आहे.

कथा खुप साधी तरीही वेळोवेळी वळणे घेणारी आहे. शिवाजी पाटील (संतोष मिजगर) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांचा लहाणपणीचा मित्र भिमा वाघमारे (सुरेश पिल्लई) उपजिल्हाधिकारी आहेत. भिमाला शिवाजीच्या वडीलांनी शिकवून मोठा केलेलं आहे. परिस्थितीमुळे आपण मोठा अधिकारी बनू शकलो नाही पण आपल्या मुलाने कृष्णाने (नरेंद्र देशमुख) आपले स्वप्न पूर्ण करावे हे साधे स्वप्न. कृष्णाच्या शिक्षणासाठी वडिलोपार्जीत वाडा शिवाजी गहाण ठेवतात तो शेठही खूप चांगला. कृष्णाचे त्याच्याच काॅलेजमध्ये शिकणाऱ्या भिमा वाघमारेंच्या मुलीवर पुष्पावर (भाग्यश्री मोटे) प्रेम जडते. पण पुष्पाचा भाऊ सम्राटला (कपील गुडसूरकर) हे संबंध मान्य नसतात व तो कृष्णाला मारहाण करतो. कृष्णामुळे पाटील कुटूंबाची बदनामी होते आणि शिवाजीला वाटतं की आपलं पोरगं वाया गेलं. पण तेव्हाच कृष्णा प्रेम बाजूला ठेवून IAS होण्याचं ठरवतो आणि मुंबईला जातो. तिथे त्याच्या क्लासमध्ये असणारी पायल (प्रतिमा देशपांडे) त्याला मदत करते. कृष्णा मोठा अधिकारी होऊन शिवाजीचे स्वप्न पूर्ण करतो का? त्याला त्याचे प्रेम मिळते का? हे पहाण्यासाठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे साधी सोपी तरीही उत्कंठा वाढवणारी कथा आणि संवाद. चित्रपटात फॅमिली ड्रामा उत्तम जुळून आला आहे. चित्रपट नांदेड आणि मुंबईत शुट झाला आहे त्या लोकेशन्सही छान निवडल्या आहेत. सिनेमा तांत्रिक दृष्ट्या सरस झाला आहे, प्रामुख्याने चित्रपटाची सिनेमॅटोग्राफर सुधाकर रेड्डी यंकाती यांनी टीपलेली दृश्ये. चित्रपटाची सर्वच गाणी खुप सुंदर आणि कर्णमधुर आहेत. राधेला पाहूनी, तूला पाहून, पाटील पाटील, सुर्य थांबला चित्रपट पुढे न्यायला मदतच करतात.

चित्रपटात संतोष मिजगर, भाग्यश्री मोटे, प्रतिमा देशपांडे आणि वर्षा दांदळे यांची कामं छान झाली आहेत. नरेंद्र देशमुखला त्याच्या अभिनयावर थोडी अजून मेहेनत करावी लागेल. एकूनच अभिनय चांगला जूळून आला आहे. काही प्रसंग जीवाला चटका लावतात, तर काही अश्रू आणतात.

हा चित्रपट चांगला मेसेज देतो की स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे लागत नाहीत, लागते ती जिद्द आणि स्वतःवर विश्वास. असा हा कौटुंबिक चित्रपट तुम्ही नक्की एकत्र मित्र-मंडळी कुटूंबासोबत बघा. मी पाटील चित्रपटाला देतोय ४ स्टार्स.

Rating: 4 Stars

Movie: Patil | पाटील
Director: Santosh Rammeena Mijgar
Cast:

Shivaji Loton Patil as Bapurao Patil
Santosh Mijgar as Shivaji Patil
Varsha Dandle as Akka
Bhagyashree Mote as Pushpa Waghmare
Narendra Deshmukh as Krishna Patil
Pratima Deshpande as Payal
Suresh Pillay
Kapil
Dr. Jagdish Patil
Special Appearance - Dr. Subhash Chandra (Zee Network Chairman)

Story & Screenplay & Dialogues: Santosh Rammeena Mijgar
Music: Anand-Milind, Sonali-Uday, Prabhakar Narwade, D. H Harmony, S.R.M. Alien

Lyrics: Guru Thakur, Sameer, Suresh Panda-Jafer, Sanjay Warang, S.R.M.
Genre: Family Drama
Release Date: 26th October 2018
Duration: 130 mins

2.9285714285714 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 2.93 (7 Votes)
Advertisement