झी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबर महिन्याची सुरुवात धमाकेदारपणे झाली आहे, कारण नुकतंच झी युवाने आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'तू अशी जवळी रहा' ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिका साकारत आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची. या मालिकेचं शीर्षक गीत देखील तितकच श्रवणीय आहे. त्याची एक झलक झी युवाच्या सोशल मीडियावर टिझर रूपात पोस्ट केली असून हे गाणं प्रेक्षकांच्या भलतच पसंतीस पडलं आहे.

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकवर्गातून भरभरुन दाद मिळताना दिसतेय. अश्विनी शेंडे-बगवाडकरच्या लेखणीतून हे शीर्षकगीत तयार झालं असून नीलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलंय. टिकोजीराव ऐदी... आड येते ही छत्रीवाली असे धमाल शब्द असलेल्या या गाण्याला तरुणाईकडून पसंती मिळताना दिसतेय.

झी युवा आपल्या लाडक्या रसिक प्रेक्षकांसाठी 'सूर राहू दे' ही नवी मालिका नुकतीच सादर केली. ही मालिका १ ऑक्टोबरपासून सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर झाली आहे. गौरी एक साध्या सरळ भावनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका सादर करणार आहे. एक वेगळं कथानक असलेल्या या मालिकेचं शीर्षक गीत देखील खूप श्रवणीय आहे. नुकतेच सोशल मीडियावरील गाण्याच्या टिझरने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या गाण्याला आवाज दिलाय नॅशनल अवॉर्ड पटकवलेल्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी.

मालिकेचं शीर्षक गीत हे त्या मालिकेची ओळख असते. रेवती आणि श्रीधर यांच्यातल्या अनोख्या नात्याचं चित्रण असलेल्या 'छोटी मालकीण' या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये आदर्श शिंदेचा सुरेल आवाज, मनात रेंगाळणारी चाल आणि लोकगीताशी नातं सांगणारे शब्द असा उत्तम योग्य जुळून आला आहे. त्यामुळेच 'छोटी मालकीण'चं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं आहे.

कलर्स मराठीवर कुंकू टिकली आणि टॅटू ही मालिका येत्या सोमवार पासून म्हणजेच २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. सुरु होत आहे. मालिकेच्या शीर्षक गीताचे नुकतेच रेकॉर्डिंग झाले असून बॉलीवूड तसेच मराठी सिनेमांमध्ये एका पेक्षा एक गाणी म्हंटल्यानंतर सुनिधी चौहान आता मराठी मालिकेकडे वळाली आहे. या मालिकेचे शीर्षक गीत सुनिधी चौहानच्या आवाजामध्ये स्वरबध्द करण्यात आले आहे. आजकल हिंदी सिनेमासृष्टीमधील बरेचसे गायक मराठीतील शीर्षक गीतांना आवाज देत आहेत.या आधीदेखील कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेचे शीर्षक गीत शाल्मली खोलगडे हिने गायले होते तर सख्या रे मालिकेचे मोनाली ठाकूर हिने गायले होते. मराठी मालिकांची शीर्षकगीते ही मालिकांसाठी खूप महत्त्वाची असतात. शीर्षकगीता मधूनच प्रेक्षकांना मालिकेच्या कथेविषयी माहिती मिळते. त्यामुळे मालिकेची टीम मालिकेच्या चित्रिकरणासोबतच मालिकेच्या शीर्षक गीताला देखील तितकेच महत्व देते.

Page 1 of 3
Advertisement