Top Videos

Grid List

Watch the Trailer of Action Packed Marathi Film Dhumas.

‘धुमस’ या चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’चे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा लिखित, दिग्दर्शित 'शिमगा' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. ते पाहून या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली असतानाच, आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'शिमगा' या चित्रपटातील नवीन गाणं 'गुणगुणतंय' रिलीज करण्यात आले आहे. भूषण आणि मानसी यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं एक रोमँटिक गाणं आहे. गाण्याची सुरुवात मानसीच्या गृह्प्रवेशाने होते. लग्नानंतर फुलत जाणारं हळुवार प्रेम या गाण्यात अगदी हुबेहूब दाखवण्यात आले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून 'त्या' दोघांमधलं गोड नातं ते व्यक्त करत आहे.

शीला, मुन्नी, जलेबीबाई अशा आयटम साँग नंतर आता 'रसगुल्लाबाई' प्रेक्षकांसमोर येत आहे. आम्ही बेफिकर या चित्रपटात हे धमाकेदार आयटम साँग पहायला मिळणार असून, प्रियंका झेमसेनं या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. कडाक्याच्या थंडीत या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं.

गावखेड्यातल्या नदीकाठच्या निसर्गसौंदर्य धरतीवर काही मुलांचा खेळ रंगला आहे. 'रंग भारी रे रंगणार' म्हणत रंगलेला हा कबड्डीचा खेळ आणि सोबतच रंगपंचमीच्या रंगांची उधळण पाहताना रसिकही त्यात समरसून जातील यात काही शंका नाही. 'सूर सापटा'ची मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा चांगलीच रंगलेली असताना, आत्ता त्यातील एका गाण्याने या उत्सुकतेमध्ये आणखी भर घातली आहे. 'सूर सपाटा'मधील 'रंग भारी रे... रंगणार' हे गीत मंगेश कांगणे लिहिले असून त्याला संगीत अभिनय जगताप यांचे असून आदर्श शिंदेच्या खड्या आवाजातील या गाण्याला प्रियांका बर्वेच्या सुमधुर आवाजाचीही किनार लाभली आहे. या गाण्यातील होलिकोत्सव पाठोपाठच येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाचे मनमोहक चित्रण मनाला भुरळ पाडणारं झालं आहे ज्याचे नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे यांनी केले आहे.

It is always interesting to know how such beautiful photos are clicked by the photographers. Here we are talking about the Exclusive Holi photo of Marathi Actress Deepti Devi, who was clicked by Ace Photographer Vinayak Kulkarni. Watch exclusive behind the scene footage how this beautiful photo was created.

Here presenting the not so favorite nightmare of examination time! Timepass fame Dagadu aka Prathamesh Parab is all set with his new Marathi movie 35% Katthavar Pass directed and produced by Satish Motling. The movie will release on 20 May 2016.

EXCLUSIVE: Rupali Thorat's Swayamvar.

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि आपल्या सगळ्यांचा लाडका स्वप्नील जोशी "मी पण सचिन" या आगामी चित्रपटात क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या नवीन वर्षात स्वप्नील आपल्याला एका दमदार आणि त्याची चॉकलेट बॉयची इमेज तोडणाऱ्या अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर, सिनेमाचं गाणं आणि पोस्टर यामध्ये दिसत असलेला स्वप्नीलचा वेगळा 'लुक' आणि वेगळा आवाज ऐकून तो जरा त्याच्या 'कन्फर्ट झोन' मधून बाहेर येऊन काहीतरी नवीन करतोय हे नक्की. पण हे जेवढे सोपे दिसते, वाटते तेवढे सोपे नाहीये. कारण अशा स्वरूपाच्या भूमिकेसाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

व्हायरस मराठी या यू ट्यूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला. मुंबईतल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेन मध्ये भीक मागणारा हिजडा यांची हे गोष्ट आहे.

पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या अगदी घरा-घरापर्यंत पोहोचलेले नाव. लेखक, नाटककार, नट, दिग्दर्शक, प्राध्यापक, संगीतकार, असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले ‘पु.ल.’ महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून परिचित असले तरी राष्ट्रीय पातळीवर तितकीशी प्रसिद्धी त्यांना लाभली नाही, हे एक नवलच. आता ही पोकळीदेखील भरून काढायला सज्ज झालीय, सब टीव्ही वर २१ जुलै रोजी सुरु होत असलेली “नमुने” ही मालिका! पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील पात्रांवर आधारित असलेल्या या मालिकेत खुद्द पुलंची भूमिका साकारत आहेत प्रसिद्ध विनोदी अभिनेते संजय मोने. तसेच सर्वांचे लाडके व ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर हे सुद्धा “नमुने”मध्ये हरितात्या हे पात्र साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने ‘वाजवा’ या युट्युब चॅनेलने 'चॅट मसाला' या कार्यक्रमात 'नमुने'मधील या अभिनेत्यांची एक मुलाखत घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे हिने या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर आणि संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा दिला.

"Show business is a very serious business", "Films works on 3 things Entertainment, Entertainment and Entertainment" are phrases associated with the film industry. When we talk about Marathi film industry, there are no celebrities as they say content is the king for Marathi films. So if there are no celebrities, then what should we call the actors, technicians and other personnels? They prefer to be called as artists. Artists who itch a memorable character through their lively performance on and off camera are remembered for ages to come. Dadasaheb Phalke, V. Shantaram, Bhalji Pendharkar, Arun Sarnaik, Kashinath Ghanekar, Ashok Saraf, Sachin Pilgoankar, Mahesh Kothare, Dada Kondke, Purushottam Bere, Laxmikant Berde are few of the Fillamshtars to remember here.

अचूक शब्दांची किमया, ठेका धरायला लावणार संगीत, कलाकारांची भारी अदाकारी, सेट्स, कोरिओग्राफी या साऱ्यांची योग्य प्रमाणात सांगड घालणाऱ्यांत आघाडीचं नावं घेता येईल ते म्हणजे चेतन गरुड प्रोडक्शन्सचं. सिंगल म्युझिक अल्बम्सच्या गणितातला हुकमी एक्का म्हणून गणल्या जाणाऱ्या चेतन गरुडाची ही गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. 'खंडेराया झाली माझी दैना', 'सुरमई', 'आली फुलवली' आणि आत्ता 'बस बुलेटवर' ह्या आगामी रोमॅंटिक सॉंगने मराठी म्युझिक इंडस्ट्रीत चेतन गरुड प्रोडक्शन्सने यशस्वी चौकारच मारला आहे. तरुणांच्या मनातले भाव बिनधास्तपणे गाण्याच्या स्वरूपात मांडल्यामुळे हे गाणं गल्ली-नाका व्हाया कॉलेज कट्ट्यावर ऐकू येईल यात दुमत नाही. हे मस्तीभर गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे पण त्यापूर्वी त्याचा टिझर तुम्ही 'वाजवा मराठी' या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. विशेष म्हणजे या गाण्यात 'कुंकू टिकली आणि टॅटू' फेम आणि 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या गाजलेल्या वेबसिरीजमधील भाग्यश्री आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे.

Mann He Vede Ka Punha, Sang Na.. Tujhyatach Disate Ka Punha, Sang Na.. The Song 'Mann He Vede' depicts the deepest emotions of a human soul in a very melodious way. The music sooths the ears and the lyrics enlightens the soul. The romantic song was released few months back on social media and YouTube. The melodious song is penned by poetess Vaishali Marathe, music composed by Jeevan Marathe and sung by popular singer Anwesshaa.

अभिनेत्री अदिती द्रविडने व्हॅलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय.

Advertisement