Video Songs
Typography

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक प्रयोग "उन्मत्त" या मराठी चित्रपटासाठी करण्यात आला आहे. स्लिप पॅरालिसिस सारख्या वेगळ्या विषयावर आधारित "उन्मत्त" या साय फाय चित्रपटाच्या प्रमोशन साठी एक खास गाणे बनवण्यात आले असून त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. भुत रॅप या गाण्यामध्ये पारंपारिक भारुड आणि आधुनिक रॅप यांचा एकत्र वापर करून एक भन्नाट प्रयोग करण्यात आहे. हे गीत युगंधर देशमुखने संगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गायक जसराज जोशी यांनी ते गायले आहे तर शब्द कुमार गावडा व महेश राजमाने यांचे आहेत.

भुतांच्या विविध संकल्पना आपल्याला समाजात पाहायला मिळतात, त्यातील काही संकल्पना एकत्र करून "भूत रॅप" हे गाणे बनवण्यात आले, पूर्वीच्या काली समाजप्रबोधनासाठी भारूड या माध्यमाचा वापर होत असे, अलीकडच्या काळात रॅप संगीत तरुणाईमध्ये लोकप्रिय असल्याने या दोन्हीचा मिलाप करून एक नवीन प्रयोग या निमित्ताने करण्यात आला आहे. या गीतामध्ये सध्या समाजात घडत असलेल्या विविध घटनावर मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे, जसराज जोशी आणि नियती घाटे यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. येत्या 22 फेब्रुवारी ला “उन्मत्त” हा चित्रपट प्रदर्शित होत असून मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट म्हणून या चित्रपटाची उत्सुकता आहे.

Watch the Bhoot Rap here

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement